Covid review meeting
September 17, 2021कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) ज्या नागरिकांचे कोरोना लसीचे २ डोस पूर्ण झालेले आहेत अशा नागरिकांना स्विमिंग पूल मध्ये प्रवेश द्यावा या मागणीवर मा. अजित दादांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच स्विमिंग पूल सुरु करत असल्याचे सांगितले.२) पुणे शहरातील काही वस्ती भागांमध्ये नागरिक अजूनही लस घेण्यास घाबरत आहेत का? हे पाहणे. जे घाबरत असतील अशा नागरिकांसाठी शासनाने घरोघरी जाऊन लस घेण्यासाठी त्या नागरिकांचे प्रबोधन करावे.३) कोरना प्रतिबंध लसीचा बुस्टर डोसची गरज आहे का? यावरती प्रशासनाने अभ्यास करावा.४) गणेशोत्सव काळामध्ये काही नागरिक कोरोना नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. अशा नागरिकांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी.५) पुण्याचे कोरोना कंट्रोल मॉडेल साठी मा. पालकमंत्री, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले प्रयत्न या सर्व गोष्टींचे व्यवस्थीत डॉक्युमेंटेशन केले पाहिजे.
Add your gallery here