Press Conference to Highlight PMPML 2019
November 17, 2018पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सार्वजनिक वाहतुकीसाठी नवीन बस घेण्याबरोबरच प्रवासीभाडे वाढीच्या प्रस्तावावरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार ऑगस्ट २०१९ पर्यंत पीएमपीएमएलच्या ताफ्यात १००० नवीन बस समाविष्ट होणार असून त्यामुळे प्रत्येक बस थांब्यावर नागरिकांना दर ५ मिनिटांनी बस उपलब्ध होऊ शकणार आहे. बसच्या प्रवासीभाड्यात कोणतीही वाढ करण्याचा प्रस्ताव या बैठकीत नाकारण्यात आला आहे.
पुण्यासाठी ४०० सीएनजी नॉन एसी बस विकत घेण्यात येणार आहेत. या बस जुलै २०१९ पर्यंत टप्प्याटप्प्याने समाविष्ट होणार आहेत. तसेच १५० नवीन इलेक्ट्रिक बसही पीएमपीएमएलच्या ताफ्यात येणार असून त्यातील पहिल्या २५ इलेक्ट्रिक बस या येत्या २६ जानेवारीपर्यंत पुण्याच्या रस्त्यांवर धावतील, तर १२५ एसी इलेक्ट्रिक बस या मे २०१९ पर्यंत धावणार आहेत. याशिवाय ४४० नॉन एसी सीएनजी बस भाडेतत्वावर घेण्यात येणार असून त्या ऑगस्ट २०१९ पर्यंत धावतील.
या बैठकीत पीएमपीएमएलचा २०१३ चा आस्थापना आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पीएमपीएमएल कर्मचा-यांच्या बढत्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच बदली, हंगामी, रोजंदारी सेवकांना कायम करण्याचा मार्गही सुकर होणार आहे. २०१३ चा आस्थापना आराखडा मंजूर झाल्यामुळे कर्मचा-यांचे मनोबल वाढेल तसेच कार्यक्षमताही वाढेल.
पीएमपीएमएलचे उत्त्पन्न वाढवण्यासाठी प्रवासभाडे वाढवण्यापेक्षा इतर पर्यायी उपाययोजना केल्या जाणार असून त्यासाठीचा आराखडा तयार करून अमलात आणला जाईल.
महापौर मुक्ता टिळक यादेखील या वेळी उपस्थित होत्या
Add your gallery here