आपली शाळा… सुंदर शाळा… अभियान भाग १

January 27, 2022

आपली शाळा… सुंदर शाळा… अभियान भाग १ …!शिवाजीनगर मतदारसंघामध्ये मी वस्ती संपर्क अभियान, सोसायटी संपर्क अभियान, सार्वजनिक शौचालय पाहणी अभियान, सुरु केलेले आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे सर्व अभियान यशस्वी वाटचाल करीत आहेत. आजपासून आपल्या शिवाजीनगर मतदार संघामध्ये मी सार्वजनिक शाळेमधील शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी आपली शाळा… सुंदर शाळा… हे अभियान सुरु केलेले आहे. या अभियानाची सुरुवात प्रभाग क्र. ७ मधील वीर बाजीप्रभू विद्यालय मनपा शाळा क्र. ९० बी, गोखलेनगर येथून केली आहे. आज या शाळेची ऑनलाईन बैठक घेऊन शाळेच्या विवध समस्या जाणून घेतल्या व विविध विषयांवर मार्गदर्शन केले. सदरील शाळेमध्ये कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे चालू आहे. यामध्ये काही गोरगरीब विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नसल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहण्याचा प्रकार वाढू लागला आहे. तसेच शाळेमध्ये व्हाईट बोर्ड्स, नामफलक, रंगकाम, डागडुजी, खेळण्याची मैदाने व्यवस्थित करणे अशी वेगवेगळी कामे आहेत. सदरील कामे महापालिका, शिक्षण मंडळ, CSR निधी, आमदार निधी अशा विविध माध्यमातून येणाऱ्या काळात आम्ही करणार आहोत. या बरोबरच या अभियानातून शिवाजीनगर मतदार संघातील एकूण २४ सार्वजनिक शाळांचा आढावा घेऊन या सर्व शाळांचा शिक्षणाचा दर्जा वाढविण्याचे कार्य येणाऱ्या काळात करणार आहे.हे अभियान सुरु करण्याचा हेतू म्हणजे गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, तेथील शिक्षणाचा दर्जा वाढवा यासाठी मतदारसंघातील सार्वजनिक शाळांबरोबर समन्वय साधून तेथील विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडवून आपल्या भागातील शाळा शिक्षणाच्या दृष्टीने सुंदर करण्याचा संकल्प मी हाती घेतला असून तो सिद्धीपर्यंत पोहचविणार आहे, अशी ग्वाही मी सर्वांना देतो.या ऑनलाईन बैठकीवेळी शिक्षण मंडळाच्या मा. मीनाक्षी राऊत, मा. शिवाजी अडागळे, मा. रवी साळेगावकर, मा. गणेश बगाडे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, तसेच घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सबंधित अधिकारी उपस्थित होते.धन्यवाद !

Add your gallery here