औंध रोड येथे CNG कुपन वाटप कार्यक्रम

July 10, 2021

भारतीय जनता पार्टीचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिवाजीनगर मतदार संघातील औंध रोड भागातील रिक्षाचालक यांना सी.एन.जी भरण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे प्रत्येक रिक्षा चालकास 500 रुपयांची सी.एन.जी भरण्यासाठी कुपन वाटपाचा कार्यक्रम भाजपाचे पुणे शहर चिटणीस श्री. सुनीलजी माने यांच्या माध्यमातून पार पडला.यावेळी शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्रजी साळेगावकर, शिवाजीनगर सरचिटणीस गणेशजी बगाडे, शिवाजीनगर मतदार संघ एस.सी आघाडी प्रमुख सचिन अंकेल्लू, संपर्क प्रमुख शिवाजी नगर मतदार संघ किरण ओरसे, अन्नधान्य वितरण समिती बी झोनचे सदस्य राहुल सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Add your gallery here