खंडोजी बाबा चौक येथे पाहणी.

August 23, 2021

खंडोजी बाबा चौक येथे पाहणी…!मागील काही दिवसांत खंडोजी बाबा चौक येथील रहिवाशी व स्थानिक दुकानदार यांनी शेलार मामा चौक प्रभात रोड कॉर्नर येथून महर्षी कर्वे संस्थेच्या रस्त्यालगत ते फर्ग्युसन रोडकडे जाताना गरवारे उड्डाणपूला पर्यंत पादचारी मार्गाची अवस्था फारच बिकट असून काही ठिकाणी पादचारी मार्ग अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना चालताना खूपच त्रास होत आहे हा पादचारी मार्ग स्मार्ट सिटी अंतर्गत करावा. तसेच गरवारे उड्डाणपुलापासून फर्ग्युसन रोडकडे जाताना गुडलक चौकापर्यंत जो पादचारी मार्ग आहे तो व्यवस्थित करावा व त्याठिकाणी दुचाकी वाहने उभी करण्यासाठी पार्किंग व्यवस्था उभी करावी अशी मागणी माझ्याकडे केली होती. यानुसार आज पुणे मनपाचे कार्यकारी अभियंता श्री. दिनकर गोजारे यांना घेऊन समक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व लवकरच कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी शिवाजीनगर मंडल माजी अध्यक्ष मा. नरेंद्र उर्फ नाना मोरे, शिवाजीनगर चिटणीस मा.हर्षल मोरे, मा. अशोक ढमाले, मा.पवन दवे, मा.ऋषिकेश मोरे, मा.बाळासाहेब ढमाले, मा. नवनीत पटेल, मा. चेतन पायगुडे, मा. चंद्रसेन मोरे, मा. विशाल कचरे, मा. विश्वजीत मोरे, मा. ऋतुराज ताम्हाणे व डेक्कन भागातील व्यापारी उपस्थित होते.

Add your gallery here