जय जिनेंद्र…

April 14, 2022

जय जिनेंद्र…!आज महावीर जयंतीनिमित्त खडकी येथे आयोजित केलेल्या शोभायात्रेमध्ये उपस्थित राहण्याचा योग आला. भगवान महावीर यांनी जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून सत्य प्रेम अन मानवता यावर जग उभारी घेऊ शकेल असा संदेश दिला. तप, त्याग, संयम, प्रेम, करुणा, सदाचार हे त्यांच्या जीवनाचे सार होते. त्यांच्या विचारांचे आचरणात परिवर्तन करणे हीच त्यांना जयंतीनिमित्त खरी आदरांजली ठरेल.