पालखी सोहळा २०२२…!

June 23, 2022

पालखी सोहळा २०२२…!पुण्यनगरीत आलेल्या वारकरी बांधवांसाठी शिवाजीनगर गावठाण मित्र परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वारकरी बांधवाना महाप्रसाद वाटप करण्याचे भाग्य मला लाभले, याबद्दल मी शिवाजीनगर गावठाण मित्र परिवाराचे आभार मानतो. पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, वैभव आहे. कोरोनाकाळात पायी वारी बंद असल्यामुळे वारकरी बांधवांना गेली २ वर्षे आपल्या विठूरायाला भेटता आले नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा पायी वारी निघाल्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे व भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. यावेळी शिवाजीनगर गावठाण मित्र परिवाराचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Add your gallery here