प्रभात रोड – भांडारकर रोड येथील पाणीपुरवठा प्रश्नाबाबत प्रत्यक्ष पाहणी…!

May 13, 2022

प्रभात रोड – भांडारकर रोड येथील पाणीपुरवठा प्रश्नाबाबत प्रत्यक्ष पाहणी…!मागील काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे भांडारकर रोड व प्रभात रोड येथील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने पाणीपुरवठा अधिकारी व कर्मचारी यांचेबरोबर आज भांडारकर रोड व प्रभात रोड येथील पाणीपुरवठ्याबाबत १७ सोसायटी मध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सदरील भागातील पाणी प्रश्न गंभीर असून लवकरात लवकर हा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी सबंधित अधिकारी श्री. प्रसन्न जोशी यांच्याशी सविस्तर चर्चा करून येणाऱ्या ७ ते ८ दिवसांमध्ये हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सूचना दिल्या. शिवाजीनगर मतदारसंघातील कोणत्याही सोसायटी व वसाहती मध्ये पाण्याच्या प्रश्न असल्यास त्यांनी माझ्याशी व माझ्या टीमशी संपर्क साधावा. सदरील तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी मी व माझी टीम प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून आपल्या भागातील पाणी प्रश्न सोडवला जाईल, अशी ग्वाही देतो.यावेळी मा. सुनील पांडे, मा. गणेश बगाडे, मा. जय जोशी, मा. निलेश घोडके, पुणे मनपाचे पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता मा. प्रसन्न जोशी व कर्मचारी उपस्थित होते.

Add your gallery here