!वस्ती संपर्क अभियान

November 1, 2021

संजय गांधी निराधार योजनेचे ३ महिन्यांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा…!वस्ती संपर्क अभियान अंतर्गत मी वस्ती भागामध्ये फिरत असताना बऱ्याच जेष्ठ नागरिकांना जुलै २०२१ पासून संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान मिळत नाही अशा तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. याबाबतीत मी महाराष्ट्र शासन व तहसीलदार संजय गांधी निराधार योजना पुणे शहर यांचेकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्यास यश आले असून जुलै २०२१ ते सप्टेंबर २०२१ या तीन महिन्यांचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे अशी माहिती मला तहसीलदार संजय गांधी निराधार योजना पुणे शहर यांचेकडून देण्यात आलेली आहे. तरी सर्व लाभार्थ्यांनी याची नोंद घ्यावी ही विनंती.

Add your gallery here