शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रोचे काम आठ दिवसांत सुरु करा

November 8, 2021

शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रोचे काम आठ दिवसांत सुरु करा, अन्यथा आंदोलन करू.आज पुण्यनगरीचे खासदार आदरणीय श्री. गिरीशजी बापट यांच्या मार्गदर्शनाखाली, उपमहापौर सुनीता वाडेकर व शिवाजीनगर-औंध-बाणेर मधील सर्व नगरसेवकांनी PMRDA पीएमआरडीएचे सीईओ श्री. सुहासजी दिवसे यांना हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे संथ गतीने चालणारे काम आठ दिवसांत सुरु करणेबाबत निवेदन दिले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहराला जोडणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर अशा मेट्रो मार्गाचे काम अनेक वर्षे प्रलंबित आहे. हे नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यास अतिरिक्त खर्च वाढणार आहे आणि त्याचा भुर्दंड पुणेकरांना सोसावा लागेल, असे भाजप नेत्यांनी पीएमआरडीएला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हिंजवडी या आयटी क्षेत्रातील वाहतूक कोंडीची समस्या लवकर सोडविण्यासाठी मेट्रोचे काम लवकर होणे आवश्यक आहे, याकडेही निवेदनाद्वारे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले आहे.प्रस्तावित मेट्रो मार्गासाठी ९८ टक्के जागा ताब्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरु करावे. तसेच ज्या उर्वरित शासकीय जागा ताब्यात आलेल्या नाहीत त्या तातडीने ताब्यात घेऊन पुढील आठ दिवसांत मेट्रोचे काम सुरु करावे. अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

Add your gallery here