श्रद्धांजली सभा…!राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक कै. निवृत्ती (आप्पा) सदाशिव इरोळे यांचे नुकतेच निधन झाले.

April 15, 2022

श्रद्धांजली सभा…!राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक कै. निवृत्ती (आप्पा) सदाशिव इरोळे यांचे नुकतेच निधन झाले. आप्पा हे गेल्या ५० वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्यांनी संपर्क प्रमुख धनकवडी, उपाध्यक्ष सेवा प्रबोधिनी, मा. सदस्य डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पतित पावन संघटना, सामाजिक समरसता मंच अशा अनेक सामाजिक संघटना व सामाजिक कार्यात ते सदैव सक्रीय होते. त्यांच्या जाण्याने सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आज आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेमध्ये कै. निवृत्ती आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आप्पांच्या निधनामुळे इरोळे परिवारावर दुःखाचा आघात झाला असून ईश्वर इरोळे परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो अशी प्रार्थना केली. तसेच मी, माझे कुटुंबीय व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचा संपूर्ण परिवार त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, अशी सहवेदना यावेळी व्यक्त केली. “ॐ शांती”

Add your gallery here