सप्रेम जयगुरू…!श्री सदगुरु जंगली महाराज पुण्यतिथी

April 15, 2022

सप्रेम जयगुरू…!श्री सदगुरु जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त भव्य भजनी दिंडीसह पारंपरिक पालखी सोहळा शिवाजीनगर गावठाणचे ग्रामदैवत श्री रोकडोबा देवस्थान येथून प्रस्थान झाला. या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांसोबत सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. या निमित्ताने श्री. रोकडोबा देवाचे व श्री सदगुरूंचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी चैतन्याने व भक्तिभावाने भरलेल्या या सोहळ्याने मन प्रफुल्लित झाले.