समर्थ बूथ अभियान… भाग ५…!

July 8, 2022

समर्थ बूथ अभियान… भाग ५…!समर्थ बूथ अभियान अंतर्गत शिवाजीनगर मतदार संघामधील बूथ क्र. १६६ चे बूथप्रमुख श्री. दिनेशजी शहा, बूथ क्र. १६८ चे बूथप्रमुख श्री. राजेशजी कोळी, बूथ क्र. १६९ चे बूथप्रमुख श्री. सायलूजी चलवादी, बूथ क्र. १७० चे बूथप्रमुख श्री. योगेशजी क्यादेगिरी, बूथ क्र. १७१ चे बूथप्रमुख श्री. कुशलजी शिंदे, बूथ क्र. १७२ चे बूथप्रमुख श्री. बाळाभाऊ राऊत जी यांच्या घरी भेटी दिल्या व त्यांच्या कुटुंबीयांसोबत मनमोकळा संवाद साधला. पक्षाची ध्येय धोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची महत्वाची भूमिका बूथ प्रमुख बजावत असतो. त्याच्या मेहनतीमुळेच पक्ष यशाची शिखरे गाठत असतो. कोणतीही चळवळ कार्यकर्त्यांच्या बळावरच यशस्वी होते. तोच चळवळीचा प्राण आणि आत्मा असतो. कोणत्याही पक्षाचा विकास कार्यकर्त्यांच्या पाठबळावर होत असतो. कोणत्याही मोठ्या नेत्याचं यश जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अवलंबून असतं. शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी तो आखरी दुवा असतो. जनतेच्या अपेक्षांची त्याला पूर्ण जाण असल्यामुळे तो मतदार व नेतृत्वामधील एक पारदर्शक माध्यम ठरतो. संवादाचे हेच निर्दोष माध्यम अधिक प्रभावी असते. जनतेसाठी हाच पक्षाचा सर्वात मोठा चेहरा असतो आणि म्हणूनच तो पक्षाची ओळख ठरतो. यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे, मा. रवींद्र साळेगावकर, मा. गणेश बगाडे, मा. शैलेश बडदे, मा. प्रकाश सोलंकी, मा. प्रदीप मोरे, मा. हेमंत बोरकर, आदि उपस्थित होते.

Add your gallery here