कोरोना आढावा बैठक

July 9, 2021

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार याच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी आज खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) नागरिकांनी कोविड नियमावलीचे तंतोतंत पालन करावे. जे करत नसतील त्यांच्यावर पोलिसांनी व प्रशासनाने कडक कारवाई करावी. दिल्ली मध्ये अशीच कडक कारवाई होत असल्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. २) ज्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस पूर्ण झालेले आहेत मुख्यता महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांना RTPCR टेस्ट चे बंधन नसावे. त्यामुळे त्यांचा त्रास वाचेल. ३) ज्या नागरिकांना कोरोना re infection झाले आहे व जे नागरिक कोरोना re infection होऊन मृत्युमुखी पडले आहेत अशा नागरिकांचा वेगळा data महाराष्ट्र शासनाने व पुणे मनपाने तयार करावा. हा data नागरिकांना सुद्धा माहिती असला पाहिजे.४) गर्दी टाळण्यासाठी सर्व दुकानांच्या वेळा सातही दिवस सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ठेवाव्यात. चार वाजता व्यवहार बंद होत असल्याने दुपारी सर्वत्र गर्दी होते.

Add your gallery here