दक्षता समिती बैठक.

April 13, 2022

दक्षता समिती बैठक…!शिवाजीनगर मतदार संघामधील सार्वजनिक अन्न धान्य वितरण व्यवस्था परिमंडळ कार्यालय क विभागामधील अधिकारी व कर्मचारी तसेच नवनियुक्त दक्षता समितीचे सदस्य आणि शिवाजीनगर मतदारसंघातील सर्व रेशन दुकानदारांसोबत सविस्तर बैठक आज घेतली. या बैठकीमध्ये नवनियुक्त दक्षता समितीच्या सदस्यांचे अभिनंदन केले व आपल्या भागातील गरीब गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काचे धान्य तसेच रेशन बाबतीतल्या तक्रारी जास्तीत जास्त सोडवून त्यांना मदत करावी आणि येणाऱ्या काळात शिवाजीनगर परिमंडळ कार्यालय क विभाग, दक्षता समितीचे सदस्य व रेशन दुकानदार यांच्यामध्ये समन्वय साधून सर्वांनी एकत्र येऊन गरिबांची सेवा प्रामाणिकपणे करावी असे आवाहन या बैठकीत केले. यावेळी मा. एस एस खोमणे मॅडम (परिमंडळ अधिकारी क विभाग, शिवाजीनगर), मा. गणेश बगाडे, मा. महेंद्र उर्फ बंडू कदम तसेच सर्व नवनिर्वाचित दक्षता समितीचे सदस्य व रेशन दुकानदार आणि परिमंडळ कार्यालय क विभागामधील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Add your gallery here