बोपोडी येथे CNG किट व धान्य किट वाटप

July 10, 2021

भारतीय जनता पार्टीचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिवाजीनगर मतदार संघातील बोपोडी भागातील रिक्षाचालक यांना सी.एन.जी भरण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये प्रमाणे प्रत्येक रिक्षा चालकास 500 रुपयांची सी.एन.जी भरण्यासाठी कुपन वाटपाचा कार्यक्रम आज पार पडला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यभर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतून रिक्षा वाहतुकीला वगळण्यात आले असले तरीही, प्रवासीच नसल्यामुळे रिक्षाचालक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न रिक्षाचालकांसमोर पडला आहे. यासाठी त्यांना हातभार लावावा या प्रामाणिक हेतुने हा कार्यक्रम श्री. आनंदजी छाजेड (सरचिटणीस शिवाजीनगर) यांनी आयोजित केला होता. यावेळी श्री. रवींद्र साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर), श्री. परशुराम वाडेकर (नेते आर पी आय (आठवले) ), श्री. सुनील माने (चिटणीस भाजपा पुणे शहर) श्री.गणेश बगाडे (सरचिटणीस शिवाजीनगर), श्री. रमेश नाईक (प्रवक्ते शिवाजीनगर भाजपा), श्री. संकेत कांबळे (भाजपा शिवाजीनगर सरचिटणीस एस सी आघाडी), श्री. राजु पिल्ले (झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष शिवाजीनगर ), श्री. संदीप वाघमारे, श्री. देवेंद्र बिडलान, श्री. अभिषेक चव्हाण, श्री. क्षितीज माने, श्री. रवी नायर, श्री. नितीन कुलकर्णी, श्री. नवीन धस, आदि उपस्थित होते.

Add your gallery here