विविध क्रीडा प्रकारच्या संकुलांचे उद्घाटन

May 28, 2022

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये नव्याने साकार करण्यात आलेल्या विविध क्रीडा प्रकारच्या संकुलांचे उद्घाटन आज केंद्रीय क्रीडा मंत्री मा.श्री. अनुराग ठाकुरजी यांच्या शुभ हस्ते पार पडले. तसेच पै.खाशाबा जाधव क्रीडा संकुल नामकरण व पै.खाशाबा जाधव आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. विद्यापीठातील २७ एकर सारख्या विस्तीर्ण परिसरात या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची निर्मिती केली असून त्यामध्ये सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅक, फुटबॉल, लॉन टेनिस कोर्ट, आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार शूटिंग रेंज, अद्ययावत व्यायाम शाळा, खो-खो, कबड्डी, कार्फ बॉल, हॅन्ड बॉल असे मैदानी खेळाचे क्रीडांगण तयार करण्यात आले आहे. तसेच बहुउद्देशीय इनडोअर हॉल तयार करण्यात आला असून यामध्ये बॅडमिंटन, बास्केट बॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, कुस्ती, बॉक्सिंग, असे विविध क्रीडा प्रकार खेळता येणार आहेत. यावेळी पुणे शहराचे खासदार मा. गिरीश भाऊ बापट, कुलगुरू मा. कारभारी काळे, मा. राजेश पांडे, मा. सुनेत्राताई पवार, मा. प्रसन्नजीत फडणवीस, मा. प्रफुल्ल पवार, मा. दीपक माने तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

Add your gallery here