कोरोना आढावा बैठक

August 20, 2021

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) पुणे शहरातील काही वस्ती भागांमध्ये नागरिक अजूनही लस घेण्यास घाबरत आहेत. अशा वस्त्यांमध्ये शासनाने घरोघरी जाऊन लस घेण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करावे.२) पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन चे प्रमाण वाढत असून त्याच्यावर शासनाने अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे असून अशा रुग्णांवर योग्य तो उपचार करावा व त्यांचा स्वतंत्र data तयार करावा.३) कोविड काळात महाराष्ट्र तसेच पुणे पोलिसांनी खूप चांगले काम केलेले आहे. आता अनलॉक होत असताना नागरिक कोविड नियमांचे पालन करतात कि नाही आणि नसतील करत तर त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता पथक नेमावे.४) बाहेरच्या काही देशांमध्ये शाळा / कॉलेज सुरु करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार त्यांनी कशा पद्धतीने शाळा / कॉलेज सुरु ठेवल्या आहेत याचा अभ्यास करून त्याच धर्तीवर आपल्याकडे सुद्धा शाळा / कॉलेज सुरु कराव्यात. ५)पुण्याचे कोरोना कंट्रोल मॉडेल साठी मा. पालकमंत्री, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले प्रयत्न या सर्व गोष्टींचे व्यवस्थीत डॉक्युमेंटेशन केले पाहिजे.

Add your gallery here