MARATHI BHASHA DIN

February 29, 2016

जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित मराठी स्पंदन पुरस्कार 2016 या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलाविण्यात आले. या निमित्ताने मराठी साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातून मराठी भाषेसाठी अमूल्य योगदान दिलेल्या व्यक्तींचा गौरव करण्याचा योग आला. मला असे वाटते की कलेची ताकत ही खुप मोठी आहे त्याचबरोबर कलाकारांना पुरस्कार देवून त्यांचा गौरव करून आयोजकांनी समाजा मधे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करायचे कार्य केले आहे,

जे माझ्या मते एक राष्ट्र निर्माणाचे कार्य आहे. या निमित्ताने पुरस्कारर्थी मा. राजन खान, मा. अविनाश देशमुख, मा. छाया कूतेगावकर, मा. कविवर्य हगवणे, मा. मधूसूधन घाणेकर, मा. उमेश सावक अशा किर्तीवंत कलाकारांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.