No Lockdown in Pune

February 21, 2021

पुण्यात लॉकडाऊन नाही. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत मी प्रशासनाला विनंती केली कि कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी ती नियंत्रणात आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू करण्याचा तूर्त कोणताही विचार करू नये, पण व्यक्ती व आस्थापनांकडून एस.ओ.पी व प्रोटोकॉलचे निरीक्षण करण्यात दक्षता वाढावी आणि अर्थव्यवस्था व नागरिकांवर नवीन ताळेबंद घालू नये. मा. उपमुख्यमंत्री आणि प्रशासनाने सहमती दर्शविली आणि पोलिस अधिकार्यांना कडक नजर ठेवण्यावर भर दिला आहे.पुण्यासाठी नवीन निर्बंध आणि मार्गदर्शक २८ फेब्रुवारी पर्यंत जारी केली गेली आहेत.- शहरात सर्व अनावश्यक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, बार रात्री ११ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. शहरात रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यानअनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.- शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.- नियमांचे पालन करुन अभ्यासिका सुरु ठेवता येतील.- सोहळ्यास किंवा समारंभास कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून केवळ २०० जणांची उपस्थितीच असावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे

Add your gallery here