University flyover traffic diversion meeting

June 23, 2020

स्तावित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ उड्डाणपूलाच्या पुनर्निर्माण कालावधी दरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी त्या दृष्टीने पर्यायी रहदारी मार्ग आणि परिसराची पाहाणी आज महापालिकेचे, पोलीस खात्याचे आणि पीएमआरडीएचे अधिकारी यांच्या समवेत केली.
या पाहाणीमध्ये औंध, बाणेर रोडवरील पर्यायी रहदारी मार्ग प्रामुख्याने विचार करण्यात आला. आधी जेव्हा हे दोन्ही पूल बांधले गेले त्यावेळी वाहतूक नियोजन नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. आता हे पूल पुन्हा बांधले जात असताना वाहतूक नियोजन व्हावे जेणेकरुन वाहतुकीला अडथळा येणार नाही अशी त्यादृष्टीने आता आराखडा करण्यात येत आहे. हा आराखडा स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांसमोरही मांडला जावाअसे मी प्रशासनाला निवदेन केले आहे.
या वेळी महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पीएमआरडीएचे कमिशनर विक्रम कुमार, पोलीस सहआयुक्त डॉ.राजेंद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त(वाहतूक) डॉ.संजय शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) सुरेंद्र देशमुख, महानगर नियोजन प्रमुख विवेक खरवडकर, महापालिकेचे मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला आदी उपस्थित होते.

Add your gallery here