औंध बोपोडी भागात आयुष्मान भारत कार्ड वाटप

July 12, 2021

भारतीय जनता पार्टी पुणे शहर चिटणीस मा.श्री. सुनीलजी माने यांच्या माध्यमातून औंध – बोपोडी भागातील १२०० नागरिकांना प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप कार्यक्रम पुण्यनगरीचे लोकप्रिय खासदार मा.श्री. गिरीषभाऊ बापट व माझ्या हस्ते पार पडला.भारताचे आदरणीय पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी साहेबांनी 2018 साली या योजनेचा शुभारंभ केला. ‘सर्वांसाठी आरोग्य’ ह्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी ‘आयुष्यमान भारत’ योजना महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बीपीएल कुटुंबाला केंद्र शासनाकडून 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येतो. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना शासनाने निवडलेल्या शासकीय व खासगी रुग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांना (बीपीएल धारकांना) आरोग्य विमा प्रदान करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.यावेळी मा. दत्ताभाऊ खाडे (सरचिटणीस पुणे शहर), मा. रवींद्र साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर), नगरसेवक प्रकाश उर्फ बंडू ढोरे, नगरसेवक अजय खेडेकर, सरचिटणीस आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, अनिल भिसे, उत्तम बहिरट, रमेश नाईक, सुप्रियाताई खैरनार, सोनालीताई भोसले, सुप्रीम चोंधे, सौरभ कुंडलिक, नितीन बहिरट, रोहित भिसे, राजू पिल्ले, शिवाजीनगर भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Add your gallery here