चतुश्रुंगी परिसरात नव्याने बांधण्यात आलेली पाण्याची टाकीची पाहणी

August 24, 2021

आज चतुश्रुंगी परिसरात नव्याने बांधण्यात आलेली पाण्याची टाकीची पाहणी केली. सदरील टाकीची साठवण क्षमता ६.५ एमएलडी असून येथून औंध, पाषाण, आय.टी.आय रोड, स्पायसर कॉलेज या भागांना पाणी पुरवठा होत असतो. सदर भाग ३ झोन मध्ये विभागून या भागामधील सन २०४७ च्या अंदाजित लोकसंख्या वाढ विचारात घेऊन समान पाणी वाटप योजनेचे (२४x७) नियोजन केलेले आहे. सदर पाण्याच्या टाकीपासून मुख्य लाईन 1000 मी.मी व्यासाची टाकणेचे काम सुरु असून सर्व कामे पूर्ण होण्यास ६ महिने कालावधी लागेल असे सांगण्यात आलेले आहे.यावेळी मा. रवींद्र साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर भाजपा), मा. वसंत तात्या जुनावणे, मा. सौरभ कुंडलिक, तसेच पुणे मनपाचे पाणी पुरवठा अधिकारी उपस्थित होते.1,948People Reached197EngagementsBoost Post

1491492 Comments2 SharesLikeCommentShare

Add your gallery here