छात्रशक्ती – राष्ट्रशक्ती..!

August 26, 2021

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या खडकी उपनगरातील नामफलकाचे अनावरण आज केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी आघाडीवर राहून संघर्ष करणारी जगातील एक नंबर ची विद्यार्थी संघटना म्हणजे “अभाविप “, राष्ट्र आणि विद्यार्थी याला सर्वोच्च प्राधान्य देणारी राष्ट्रव्यापी विद्यार्थी संघटनेत राजकारण जात पात धर्म याला अभाविप मध्ये स्थान नसते. विद्यार्थ्यांचे प्रश्न व समस्या यासाठी संघटनेचे कार्यकर्ते झटत असतात. “ज्ञान..शील..एकता..” या त्रिसुत्रीनेच हे कार्य चालते. स्वर्गीय यशवंतराव केळकर यांनी स्थापन केलेली ही संघटना भारतातील प्रत्येक प्रांतात प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात काम करत आहे. विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार करण्यासाठी प्रवृत्त करून समाज बांधणी करण्यासाठी कार्यकर्ते निर्माण करणारी संघटना म्हणजे “अभाविप “. या फलक अनावरण प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी मा. आनंद छाजेड, मा. अमर देशपांडे, मा. प्रसाद आठवले, मा. कार्तिकीताई हिवरकर, मा. नेहाताई गोरे, मा. अजित पवार, मा. सुरेंद्र भाटी, मा. गणेश नाईकरे, मा. धीरज गुप्ता ,मा. भूषण जाधव (सह मंत्री अभाविप गणेशखिंड नगर), मा. जय भाटीया (खडकी अभाविप उपनगर प्रमुख), मा. संकेत दुधाळ, मा. निर्ज पंगुडवाले, मा. स्नेहल पाचंगणे, मा. नितीन शिंदे, मा. शुभम थोरात, मा. विशाल खंडाळे, मा. अभय नामदेव, मा. आर्य वाघ, मा. तन्मय मोघे, मा. अनिश जाधव, मा. प्रतिक फाळके आदि उपस्थित होते. Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP)