पाताळेश्वर लेणी पाणीप्रश्न लवकर सुटणार

April 30, 2022

पाताळेश्वर लेणी पाणीप्रश्न लवकर सुटणार.पाताळेश्वर लेणी येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज महापालिकेच्या पाणी विभागाचे अधिक्षक अभियंता प्रसन्न जोशी आणि कनिष्ठ अभियंता सुभाष खिलारे यांच्यासमवेत पाहाणी केली. जंगली महाराज रस्त्यावर काही ठिकाणी पाण्याची समस्या आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पाताळेश्वर लेणी येथे नवीन नळजोड (नळ कनेक्शन) देणे आवश्यक आहे. नवीन नळजोड घेण्यासाठी जंगली महाराज रस्ता येथे काही भागात खोदाई करावी लागेल असे लक्षात आले, तेव्हा पथविभागाचे प्रमुख व्ही.जी.कुलकर्णी आणि वाहतूक विभागाचे श्रीरामे या अधिकाऱ्यांशी फोनवर लगेचच चर्चा केली तेव्हा त्या अधिकाऱ्यांनीही या कामासाठी तत्वतः मंजुरी दिली. त्यामुळे लेण्यांसाठी नळजोड देण्याचे काम लवकर सुरू होईल.पाताळेश्वर लेणी पाहाण्यासाठी पर्यटक तसेच अभ्यासकही येत असतात हे लक्षात घेऊन येथील पाणीपुरवठ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्याचे सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Add your gallery here