बोपोडी येथे मोफत लसीकरण केंद्राचे उदघाटन

July 10, 2021

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला भीमज्योत नगर बोपोडी येथे मोफत लसीकरण केंद्र सुरु !पुणे शहर भाजपा प्रसिद्धीप्रमुख व शिवाजीनगर मतदारसंघाच्या महिला आघाडी सरचिटणीस सौ. सोनालीताई शितोळे भोसले यांच्या प्रयत्नातून आणि पाठपुराव्यातून बोपोडी भीमज्योत नगर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला येथे मोफत लसीकरण केंद्राचे उद्घाटन आज केले. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतामध्ये सुरु आहे. कोरोनाला देशातून हद्दपार करण्यासाठी आपण या मोहिमेला बळकटी देऊया . मी सर्व नागरिकांना विनंती करतो की या लसीकरण केंद्राचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.यावेळी महापौर श्री. मुरलीधर आण्णा मोहोळ, उपमहापौर सुनीताताई वाडेकर, श्री.दत्ताभाऊ खाडे (सरचिटणीस, भाजपा पुणे), नगरसेवक प्रकाश उर्फ बंडू ढोरे, मा. महापौर दत्तात्रय गायकवाड, श्री.रवींद्र साळेगावकर (अध्यक्ष शिवाजीनगर), श्री.गणेश बगाडे (सरचिटणीस शिवाजीनगर), श्री. आनंद छाजेड (सरचिटणीस शिवाजीनगर) डॉ. अपर्णाताई गोसावी (अध्यक्ष शिवाजीनगर ), श्री, सुनील माने, श्री. उत्तम बहिरट, अपर्णाताई कुऱ्हाडे, भावनाताई शेळके, सुप्रियाताई खैरनार, श्री. गणेश कालापुरे, श्री. राजू पिल्ले, श्री. सुप्रीम चोंधे, श्री. किरण ओरसे आदि उपस्थित होते.

Add your gallery here