कोरोना बैठक

October 1, 2021

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्या पार्श्वभूमीवर शाळा भरत असताना जसे राष्ट्रगीत होते तसेच प्रत्येक शाळेत कोरोनासंबंधित जी खबरदारी घ्यायची आहे त्याची माहितीही रोज दिली जावी. याबाबत मा. अजित दादांनी सबंधित अधिकाऱ्यांना ही मागणी अंमलात आणण्याबाबत सूचना दिल्या.२) कोरोना महामारीच्या अगोदर व्यवसाय चालू ठेवण्याची जी वेळ होती तशीच वेळ आता व्यावसायिकांना द्यावी. याबाबतीत मा. दादा सकारात्मक असून दि. ८ ऑक्टोबर २०२१ रोजी निर्णय घेणार आहेत.३) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे, असे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. याबाबत नागरिकांना अधिक माहिती व गाईडलाईन उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून कोणतेही पिडीत कुटुंब या पासून वंचित राहू नये.

Add your gallery here