‘’खेलो इंडिया’’

May 28, 2022

‘’खेलो इंडिया’’ योजनेंतर्गत चिखलवाडी येथे अत्याधुनिक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान तयार करावे…!आपल्या शिवाजीनगर मतदार संघामध्ये हॉकीपटू श्री. धनराज पिल्लेंसारखा नामवंत खेळाडू तयार झाला. त्यांनी भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले व भारताचे नाव हॉकी क्षेत्रात उज्वल केले असून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम, चिखलवाडी येथे हॉकी शिकले.खडकी – बोपोडी येथे अनेक हॉकी खेळणारे खेळाडू आहेत. परंतु त्याठिकाणी अत्याधुनिक खेळाचे मैदान नसल्यामुळे त्यांना १५ ते २० किलोमीटर लांब बालेवाडी किंवा पिंपरी येथे खेळण्यास जावे लागते. तरी खडकी बोपोडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्टेडियम, चिखलवाडी येथे एक अत्याधुनिक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी मैदान ‘’खेलो इंडिया’’ योजनेंतर्गत तयार करावे, अशा मागणीचे पत्र पुणे दौऱ्यावर असलेले केंद्रीय क्रीडा मंत्री मा.श्री. अनुराग ठाकूर जी यांना दिले. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून नक्कीच याबाबत पुढे कार्यवाही होईल, असा मला विश्वास आहे.

Add your gallery here