जागतिक तंबाखू विरोधी दिन…!

May 31, 2022

जागतिक तंबाखू विरोधी दिन…!आज जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून मनोदय व्यसनमुक्ती संस्था यांनी शिवाजीनगर मतदार संघातील पाटील इस्टेट येथे राबविलेल्या जनजागृती अभियान रॅली आणि पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमास भेट देऊन उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला.मनोदय व्यसनमुक्ती संस्था पुणे शहरात मागील तीन वर्षांपासून वस्ती पातळीवर निशुल्क काम करत आहे. व्यसन सोडण्याची इच्छा असलेल्या सर्व लोकांना मदत करण्याबरोबरच वस्ती पातळीवर १४ ते २२ वयोगटातील मुला – मुलींनी व्यसनी होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रम राबवत असतात. मनोदय व्यसनमुक्ती संस्थेचे समाजोपयोगी कार्य माझ्या मनाला नक्कीच भावले आहे. त्यांनी सामाजिक जाणीवेतून लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल मनोदय संस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचे मी मनःपूर्वक आभार मानतो व त्यांच्या हातून अशीच राष्ट्राची मानवतेची सेवा घडत राहो या मनापासून शुभेच्छा देतो.यावेळी मनोदय संस्थेचे कार्यकारी संचालक मा.डॉ. विष्णू श्रीमंगले, मा. रवींद्र साळेगावकर, मा. प्रकाश सोलंकी, मा. जय जोशी, आदि उपस्थित होते.

Add your gallery here