पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आढावा बैठक…!

May 25, 2022

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आढावा बैठक…!हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पीएमआरडीए आणि टाटा कंपनी च्या अधिकाऱ्यांसमवेत आज बैठक घेतली. त्यावेळी अनेक वाहनचालकांच्या वाहतूक कोंडीच्या तक्रारी येत असल्यामुळे पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल त्वरित करावा अशी मागणी या बैठकीत केली. पीएमआरडीए चे आयुक्त श्री. सुहास दिवसे यांनी तेथील भूसंपादनाचे काम महापालिकेने केल्यानंतर तातडीने उड्डाणपूल बांधण्यास प्रारंभ करण्याचे आश्वासन यावेळी दिले.पुणे विद्यापीठ चौकात दोन्ही बाजूला ४.५ मीटरच्या रस्त्याची जागा ताब्यात घ्यावयाची आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण केल्यावर तेथील वाहतूक सुरळीत होईल व उड्डाणपुलाचे काम देखील जलद गतीने होईल असे दिवसे यांनी बैठकीत सांगितले.मी येत्या आठवड्यात भूसंपादना संदर्भात पुणे मनपा आयुक्त श्री. विक्रम कुमार यांचेशी चर्चा करणार आहे.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलीटीन रिजन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी – पीएमआरडीए) ने प्रस्तावित केलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे सध्या तीन ठिकाणी काम सुरु आहे. या मार्गावर एकूण २३ मेट्रो स्थानके होणार आहेत. तसेच खांब उभारणीचे काम सुद्धा सुरु असून हिंजवडी येथे मेट्रो स्थानकाचे काम देखील सुरु केले आहे आणि येणाऱ्या ३ वर्षात हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गीकेचे काम पूर्ण करण्यात येणार आहे, असे या बैठकीत सांगण्यात आले.