मेट्रो प्रकल्पात बाधित होणाऱ्या स्टॉल धारकांच्या पुनर्वसना सबंधित जागेवर जाऊन पाहणी केली.

October 5, 2021

आज छत्रपती संभाजी महाराज उद्यान येथे मेट्रो प्रकल्पात बाधित होणाऱ्या स्टॉल धारकांच्या पुनर्वसना सबंधित जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक स्टॉल धारकांच्या मागणी नुसार जेव्हा मेट्रो चे भव्य स्थानक होईल त्यावेळी त्यांच्या स्टॉल चे फूडमॉल मध्ये रुपांतर करून सर्व स्टॉल धारकांना त्याठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. यासंदर्भात लवकरच पुणे मेट्रो प्रशासनाशी चर्चा करून हा विषय मार्गी लावण्याचा माझा मानस आहे.यावेळी पुणे मनपाचे अतिक्रमण विभाग प्रमुख श्री. माधव जगताप, स्थानिक स्टॉल धारक श्री. अरविंद परदेशी, श्री. देवेंद्र अग्रवाल, श्री. अजय दुधाळ, श्री. दत्ता सूर्यवंशी, श्री. अजय कदम, श्री. गणेश उभे, श्री. किशोर स्वामी, श्री. श्रीमंत जगताप आदि उपस्थित होते.

Add your gallery here