‘’मी सुरक्षित, प्रभाग सुरक्षित’’

October 5, 2021

‘’मी सुरक्षित, प्रभाग सुरक्षित’’ या संकल्पनेतून कोरोना काळात प्रभाग क्र. १४ मध्ये मा. प्रतुल जागडे (सरचिटणीस शिवाजीनगर भाजपा) व मा. अपूर्व खाडे (अध्यक्ष भाजयुमो शिवाजीनगर) यांच्यावतीने करण्यात आलेल्या विविध सेवाकार्यांचा अहवाल प्रकाशन सोहळा आज पार पडला.लोकप्रतिनिधी हा कामातून दिसला पाहिजे त्याचबरोबर त्याने आपल्या कार्याचा लेखाजोखा नागरिकांसमोर सादर केलाच पाहिजे अशी स्व. रामभाऊ म्हाळगी यांनी दिलेली शिकवण आज भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता जोपासतो हे पाहून अभिमान वाटला. कोरोना काळात देशभरातील भाजपा चे कार्यकर्ेा रस्त्यावर उतरून नागरिकांची सेवा करताना दिसत होते. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी मी या आपल्या पक्षाच्या विचारधारेचे पालन करून आपल्या जीवाची पर्वा ना करता कोरोना काळात प्रत्येक कार्यकर्त्याने केलेल्या सामाजिक कार्याचा मला गर्व आहे. देशावर कोणतेही संकट आले ते परतवून लावण्यासाठी यापुढे देखील याच विचारधारेने भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता कार्य करेल असा मला विश्वास आहे. यावेळी खासदार मा. गिरीश भाऊ बापट, शहराध्यक्ष मा. जगदीश मुळीक, महापौर मा. मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष मा. हेमंत रासने, पुणे शहर संघटन सरचिटणीस मा. राजेश पांडे, मा. दत्ताभाऊ खाडे, मा. दीपक नागपुरे, मा. गणेश घोष, मा. दीपक पोटे, मा. राजेश येनपुरे, पुणे शहर उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद ढेकणे सर, नगरसेवक मा. सुशील मेंगडे, पुणे शहर भाजयुमो अध्यक्ष मा. राघवेंद्र बापू मानकर, नगरसेविका मा. निलामाताई खाडे, नगरसेविका मा. ज्योत्स्नाताई एकबोटे, शि,नगर भाजपा अध्यक्ष रवींद्र साळेगावकर, मा. गणेश बगाडे, मा. आनंद छाजेड तसेच शिवाजीनगर मधील नागरिक, भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Add your gallery here