राज्याच्या हितासाठी विहिरींचे संरक्षण, संवर्धन व्हावे असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेजी यांच्याकडे निवेदन केले आहे.

November 13, 2020

राज्याच्या हितासाठी विहिरींचे संरक्षण, संवर्धन व्हावे असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेजी यांच्याकडे निवेदन केले आहे.
राज्यातील नदी संवर्धन, विहीरींचे सर्वेक्षण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पुणे शाहर आणि राज्यातील अस्तित्वात असलेल्या विहीरींचे संरक्षण व्हावे, नवीन विहीरींचे संवर्धन याकरिता कायमस्वरूपी धोरण ठरवावे अशा मागणीचे निवेदन मा.आदित्य ठाकरेजी यांना दिले.
नदीकाठी असलेल्या मंदिरांमधील निर्माल्याचे खत करण्यास सरकारने प्रोत्साहन द्यावे, त्यातून मंदिरांना उत्पन्न मिळेल आणि नदीत होणारे प्रदूषण टळेल. नदी आणि नदीकाठच्या जैववैविध्य ठेव्याचे जतन होईल. मंदिरातील निर्माल्याचे खत पवित्र भावनेने शेतकरी घेतील, असेही दिले. यावर विचार करण्याचे आश्वासन मा. आदित्य ठाकरेजी यांनी दिले आहे.