रोहित ला गरज आहे आपल्या मदतीची..

September 13, 2021

.!माझ्या मतदारसंघात वस्ती संपर्क अभियानाच्या माध्यमातून मी फिरत असताना श्री. सुभाष पाडळे, रा. पडाळ वस्ती, बोपोडी हे मला भेटले. त्यांनी त्यांचा मुलगा रोहितबद्दल सांगितले. 30 वर्षांच्या रोहितचा 2 वर्षांपूर्वी दुदैवी अपघात झाला होता. त्या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर जी.एम बाबूभाई मेमो हॉस्पिटल, भवानी पेठ येथे त्वरित शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्याचे प्राण तर वाचले पण दुर्दैवाने त्याला अर्धांगवायूचा झटका आला, ज्यामुळे त्याच्या शरीराच्या डाव्या बाजूला गंभीर परिणाम झाला. आता तो फक्त आपण काय बोलतो ते समजू शकतो आणि कधी कधी इतर लोकांना काही हात आणि चेहऱ्याच्या हावभावांनी प्रतिसाद देतो. तो अजूनही अंथरुणाला खिळलेला आहे आणि रुग्णालयात आहे. त्याच्या कुटुंबाने तो बरा व्हावा यासाठी एक कोटी रुपयांहून अधिक खर्च आत्तापर्यंत केला आहे. सध्या, रोहितवर जी.एम बाबूभाई मेमो हॉस्पिटल मध्ये फिजिओथेरपी व अन्य उपचार सुरू आहेत. त्याचा अंदाजे मासिक खर्च 1 लाख रुपये इतका आहे. मी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आत्तापर्यंत 1 लाख 91 हजार रुपये जमा झालेले आहेत. रोहितला अजूनही मदतीची गरज आहे.रोहित लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून आपण देवाकडे प्रार्थना ही करूया व त्याच्या उपचारासाठी आपण सर्वजण त्याला शक्य तेवढी मदत करूया. https://milaap.org/fundraisers/support-rohit-subhash-padaleआपली छोटीशी मदत सुद्धा रोहितला बर होण्यास बळकटी देऊ शकते.

Add your gallery here