“सदरक्षणाय खलनिग्रहणाय”

July 22, 2020

“सदरक्षणाय खलनिग्रहणाय”
पुणे पोलीस यांनी कोरोना काळात जी अतुलनीय कामगिरी केली आहे त्यावरती मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे. Feel the Beat / Public Pulse Survey / Pune Police Response to Covid – 19 Pandemic.
कोविड १९ विरुद्ध च्या लढाईत फ्रंटलाईनवर लढणारे पुणे पोलीस लढवय्ये शिलेदार ठरले आहेत. आपण गेल्या १०० दिवसांहून अधिक काळ स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सूर्योदय ते सूर्यास्त आणि पुन्हा सूर्यास्त ते सूर्योदय अशा प्रत्येक क्षणी कोरोनाशी लढत आहात याचा आम्हा पुणेकरांना सार्थ अभिमान आहे. ऊन, वारा, ना पावसाची भीती कोणत्याही परिस्थिती मध्ये पुणेकरांच्या रक्षणासाठी सदैव तप्तर अशा पुणे पोलिसांना माझा सलाम !