Start Development Work… !!!

July 21, 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत गेल्या चार महिन्यांपासून खोळंबलेली पुणे महापालिकेची विकासकामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी भा.ज.पा पुणेच्या शिष्टमंडळाने आज नव्याने नियुक्त म.न.पा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.

गेल्या चार महिन्यांपासून शहरातील महापालिकेची सुरू झालेली आणि अर्धवट असलेली विकासकामे खोळंबली आहेत. त्यामध्ये मेट्रो, भामा आसखेड प्रकल्प, समान पाणीपुरवठा, बसेसची खरेदी, विविध ठिकाणी उड्डाणपूल, चांदणी चौकातील वाहतूक प्रकल्प, शिवणे-खराडी नदीपात्रातील रस्ता, कात्रज कोंढवा रस्ता, आंबील ओढा पुनर्विकास, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, समाविष्ट गावांतील विकासकामे, स्मार्ट सिटी प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, ई लर्निंग प्रणाली या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. ही विकासकामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी केली आहे.

यावेळी खासदार गिरीश बापट जी, शहराध्यक्ष जगदीश मुळीक जी, महापौर मुरलीधर मोहोळ जी, आमदार माधुरी मिसाळ ताई, आमदार भीमराव तपकीर जी, मा.आ. योगेश तीळेकर जी, मा.आ. मेधा कुलकर्णी जी, बापूसाहेब पठारे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, गणेश बिडकर राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे उपस्थित होते.