सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा…!

November 20, 2021

सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा…!भारतीय जनता पार्टी पुणे शहराचे उपाध्यक्ष तसेच आमचे मार्गदर्शक सहकारी मा.श्री. सुनीलजी पांडे (लोहगांवकर) यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आज पार पडला. मा. सुनीलजी पांडे यांचा सामाजिक कार्यात नेहमीच मोठा वाटा असतो. त्यांच्याकडून व त्यांच्या टीम कडून सातत्याने समाजहिताचे कार्यक्रम नेहमी केले जातात. त्यांच्या विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट च्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवात वेगवेगळ्या देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न असतो. तसेच त्यांच्या ट्रस्ट च्या मार्फत गोर गरीब नागरिकांना मोफत रुग्णवाहिका उपलब्ध होत असते. त्यांनी कोरोना काळात नागरिकांना केलेली मदत, लसीकरणासाठी नागरिकांना केलेली मदत उल्लेखनीय आहे. याचबरोबर ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पक्षाने दिलेली जबादारी सुद्धा ते सक्षमपणे पार पडतात. आपल्या हातून अशीच समाजाची, राष्ट्राची, भाजपा ची सेवा अविरत घडो हीच गणराया चरणी प्रार्थना व आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! यावेळी नगरसेविका मा.सौ. ज्योत्स्नाताई एकबोटे, मा. अभयराव आपटे, मा. आरोग्य अधिकारी श्री. मांडेकर, मा. अभिजित मोडक, मा. समीर हाळंदे तसेच साने डेअरी चौक मित्र परिवाराचे सर्व सभासद व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

Add your gallery here