लीज धारकांना वाढीव आलेली बिले कमी करण्याची विनंती
April 12, 2022खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे ज्या नागरिकांचा ९० ते ९९ वर्षांचा ब्रिटीशकालीन करार संपुष्टात आलेला आहे अशा नागरिकांना बोर्डातर्फे नवीन वाढीव बिलांच्या नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. या बिलांमध्ये प्रचंड वाढ केली असून नागरिकांना वाढीव बिले भरणे अडचणीचे ठरत आहे. या लीज धारकांच्या वाढीव आलेल्या बिलांच्या नोटीसीबद्दल आज पुण्याचे जिल्हाधिकारी मा.डॉ. राजेशजी देशमुख यांची भेट घेतली. या नोटींसीबद्दल मी लवकरच रक्षा मंत्रालयाशी पत्र व्यवहार करणार असून लीज धारकांना वाढीव आलेली बिले कमी करण्याची विनंती त्यांना करणार आहे.
Add your gallery here