Covid review meeting

September 22, 2021

इयत्ता ९वी ते १२च्या व महाविद्यालय पुन्हा सुरू कर !गेल्या काही दिवसता हे समोर आले आहे की खासकरून सरकारी शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवणे कठीण आणि महाग होत असून त्यामुळे शाळातून सोडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना स्थितीचा आढावा बैठकीत मी राज्य सरकारला आग्रह केला की पूर्णपणे लसीकरण केलेले कर्मचारी आणि शिक्षकांसह, आणि कठोर कोविड प्रोटोकॉलच्या अंतर्गत, इयत्ता आठवी ते बारावी पुन्हा सुरू करा. विशेषत: मोठ्या प्रमाणावर ड्रॉप आऊट (शाळा सोडणारे विद्यार्थी) संख्या टाळण्यासाठी ऑफ-लाइन शिक्षण पुन्हा सुरू करण्याची अत्यंत गरज आहे.वरिष्ठ महाविद्यालये पूर्णपणे उघडण्यासाठी वी राज्य सरकार ला निवेदन केले आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचे वय 18+ वर्षे आहे, पूर्णपणे लसीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षण ऑफ-लाइन घेण्याची परवानगी दिली पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आणि सामान्य स्थितीत परत येण्यासाठी हे महत्वाचे आहे.गेल्या महिन्यात शासकीय निर्बंध शीतील केल्यावर राज्यातील अर्थचक्राला गती मिळू लागली आहे,परन्तु काही व्यावसायिक घटक मागेच राहिले आहेत, अशा घटकांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी प्रोत्साहनात्मक योजना आखाव्यात आणि त्यांना राज्य सरकारने हातभार लावावा असेही आमदार शिरोळे यांनी सुचविले. सर्वच घटकांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून अर्थचक्राला व्यापक गती द्यायला हवी, असे बैठकीत सांगितले.

Add your gallery here