Repair Work of the Drainage System At Vadar Vadi

Repair Work of the Drainage System At Vadar Vadi

January 20, 2019

वडार वाडी, रामोशीवाडी, गोलंदाज चौक ते विटकर बंगला येथे मोठ्या व्यासाची मलवाहिनी टाकण्याच्या कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. या नवीन वाहिनी ची लांबी जवळ जवळ १८०० मीटर असणार असून जाडी ६०० मिलीमीटर,४५० मिलीमीटर व ३०० मिलीमीटर जाडीची असणार आहे. याच्या मार्गात येणारी सगळी गटारांची झाकणे अत्याधुनिक पद्धतीचे असून त्यामधून उंदीर, घुशी, वगैरे आत प्रवेश करू शकणार नाहीत. हे काम पूर्ण झाल्यावर ३०% हुन अधिक गटारे उंदीर मुक्त होतील.
या कामासाठी माझ्या निधीमधून ९१.५० लाख रुपये दिले गेले आहेत.
यावेळी स्थानिक कार्यकर्ते सागर जी धोत्रे, रॅम जी म्हेत्रे, दत्त जी गुगळे, यांच्यासमवेत अनेक कार्यकर्ते, व नागरिक उपस्थित होते.

Add your gallery here