पुणे भाजपा उपाध्यक्ष श्री.सुनिल पांडे यांच्या भांडारकर रोड येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आज प्रदेशाध्यक्ष आमदार श्री.चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्री.गिरीशभाऊ बापट यांच्या शुभहस्ते तर माझ्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

February 22, 2021

गेले २८ वर्षांहून अधिक काळ पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते, आपल्या सर्वांचे मित्र, पुणे भाजपा उपाध्यक्ष श्री.सुनिल पांडे यांच्या भांडारकर रोड येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आज प्रदेशाध्यक्ष आमदार श्री.चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्री.गिरीशभाऊ बापट यांच्या शुभहस्ते तर माझ्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. सुनिलजी हे कायम नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतात, नुकतेच त्यांनी माझ्याकडे भांडारकर रोड, प्रभात रोड, बीएमसीसी रोड, लॉ कॉलेज रोड येथील नागरिकांच्या पाण्याच्या समस्येबाबत निवदेन दिले होते. या कार्यालयामार्फत परिसरातील नागरिकांच्या जास्तीत जास्त समस्या सोडविल्या जातील असे मला वाटते. जनतेच्या सेवेकरिता व पुढील कार्याकरिता यावेळी सुनिलजींना शुभेच्छा दिल्या. नगरसेविका ज्योत्स्नाताई एकबोटे, शहर सरचिटणीस दत्तात्रय खाडे, शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, मतदारसंघ अध्यक्ष रवींद्र साळेगावकर आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते