कोरोना बैठक

October 8, 2021

कोरोना – १९ च्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबत आज उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बैठक पार पडली. सदरील बैठकीमध्ये मी खालीलप्रमाणे मुद्दे मांडले.१) ज्या विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस पूर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर महाविद्यालय सुरु करण्याची मागणी मा. दादांनी मान्य करून सोमवार पासून महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय बैठकीत घेतला. २) वस्ती भागांमध्ये बऱ्याच नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही असे निदर्शनास येत आहे. अशा ठिकाणी प्रशासनाने घरोघरी जाऊन किंवा शिबीर लाऊन लस देण्याची मोहीम राबवावी. ३)वस्ती भागांमध्ये अजूनही कोरोना नियमावलीचे पालन होताना दिसत नाही अशा वस्त्यांमध्ये कोरोना नियमावलीचे पालन करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांचे प्रबोधन करावे.

Add your gallery here