भेटी लागे जीवा… लागलीस आस.

October 7, 2021

भेटी लागे जीवा… लागलीस आस…!आज घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. माझ्या शिवाजीनगर मतदार संघांतील श्री सद्गुरू जंगली महाराज मंदिर येथे जाऊन सद्गुरूंचे दर्शन घेतले व मनोभावे पूजा केली. गेल्या सहा महिन्यांपासून जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने आमच्या देवी-देवतांना कडी कुलुपात बंद करुन ठेवले होते. पण भारतीय जनता पार्टीच्या संघर्षाने या वसुली सरकारला वठणीवर आणले. आजचा दिवस माझ्यासह महाराष्ट्रातील तमाम भाविकांसाठी आनंदाचा क्षण आहे. मी सर्व भाविकांना विनम्र आवाहन करतो की सर्व भाविकांनी मास्क, सामाजिक अंतर ठेऊन देवस्थान समिती ने ठरवलेले कोरोना नियमावलीचे पालन करून दर्शन घ्यावे.

Add your gallery here