नवदुर्गा सन्मान सोहळा

October 9, 2021

नवदुर्गा सन्मान सोहळा…!समाजात आपापल्या क्षेत्रात गेली अनेक वर्षे उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महिला भगिनींचा शारदीय नवरात्रोत्सव निमित्त शिवाजीनगर भाजपा चे अध्यक्ष मा.श्री. रवींद्रजी साळेगावकर यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या नवदुर्गा सन्मान सोहळ्यास भेट दिली. मानवाला नुसते दोन डोळे दोन कान असून उपयोग नाही, तर त्याचा उपयोग समाजातील गोरगरीब, गरजू व्यक्तींच्या अडी-अडचणी पाहता आल्या पाहिजेत त्यासाठी आत्मीयतेची नजर पाहिजे व समाजात राहणाऱ्या गरजुंच्या अडचणी व यातना आपल्या कानापर्यंत ऐकू आल्या पाहिजेत. याच भावनेतून मानवतेची भावना मनात ठेवून कार्य करणाऱ्या या नवदुर्गांचा सन्मान करण्याचे भाग्य मला आज लाभले याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो.यावेळी मा. राजेश पांडे, मा. दत्ताभाऊ खाडे, नगरसेविका मा. निलीमाताई खाडे, मा. अपर्णाताई गोसावी, मा. प्रतुल जागडे, मा. गणेश बगाडे आदि उपस्थित होते.

Add your gallery here