Collector meet regarding fund for development of Jangli Maharaj Mandir.

November 10, 2021

आपल्या शिवाजीनगर मतदारसंघातील श्री सदगुरु जंगली महाराज मंदिर शिवाजीनगर ‘‘क’’ वर्ग पर्यटन स्थळास जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करणेबाबत चे पत्र आज मा. जिल्हाधिकारी डॉ.श्री. राजेश देशमुख यांना भेटून दिले. यामध्ये १) श्री सदगुरु जंगली महाराज मंदिर शिवाजीनगर ‘‘क’’ वर्ग पर्यटन स्थळ येथे दगडी पेव्हिग ब्लॉक करणे, दगडी टप्पा करणे, स्टेनलेस स्टील रेलिंग करणे, चुन्याची पॉइलिंग करणे, सोलिंग, मुरूम फिटिंग, मंदिर परिसरात भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था व मंदिर परिसराचा विकास व भाविकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करणे. (रक्कम २५ लक्ष) २) श्री सदगुरु जंगली महाराज मंदिर शिवाजीनगर ‘‘क’’ वर्ग पर्यटन स्थळ येथे सभा मंडप, मुख्य प्रवेशद्वार जतन संवर्धन व दर्जा वाढ करणे. (रक्कम २५ लक्ष)वरील कामांसाठी मा. जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच हा विषय अंदाज समिती (estimate committee) कडे मान्यतेसाठी पाठवणार असल्याचे सांगितले.

Add your gallery here